‘मोबाईल’ या ‘उपकरणाकडे’ पहाण्याचा दृष्टीकोन
मोबाईल म्हणजे एकटेपणाचा साथीदार ।
मनाला एकटे वाटले की, तोच जणू आधार ॥ १ ॥
‘चार्जिंग’ संपले की, जो स्वतः होतो निराधार ।
तो दुसर्याला कसा देणार आधार ॥ २ ॥
ताण आला की, बरेच जण ‘मोबाईल’चा आधार घेती ।
बरे होण्यासाठी ‘मोबाईल’ मध्येच काहीतरी करती ॥ ३ ॥
ताणाचे विचार विसरण्यासाठी त्यातून मिळते तात्पुरती सुटका ।
पण त्याच्यामुळेच रहातोस तू अजूनच तुझ्या स्वभावदोषांमध्ये अटका (टीप १) ॥ ४ ॥
‘मोबाईल’ असे नानाविध प्रकारच्या सेवेची संधी ।
सोडून दे तू तो आता, त्याची अनावश्यक चढते धुंदी ॥ ५ ॥
घेऊ नकोस त्याच्या आवरणाचा अनावश्यक भार तुझ्या खांदी ।
करून दाखव या संधीची (टीप २) आता तू सुवर्णसंधी ॥ ६ ॥
टीप १ : ‘मोबाईलचा’ अतिरिक्त वापर, म्हणजे आसक्तीमध्ये अडकून गुंतून रहाणे
टीप २ : ‘मोबाईल’च्या उपयोगितेची मिळालेली संधी साधना किंवा सेवा यांच्या दृष्टीने अधिक लाभदायक स्वरूपाने करून घेणे
– श्री. हृषिकेश गायकवाड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.२.२०२१)