बुलढाणा येथे असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणाच्या वेळी औरंगजेबाच्या नावाच्या घोषणा !
बुलढाणा – जिल्ह्यातील मलकापूर येथे ‘एम्.आय.एम्.’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ओवैसी यांच्या भाषणाच्या वेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. ‘जबतक सूरज चाँद रहेगा, औरंगजेब तेरे नाम रहेगा ।’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. या संदर्भात सामाजिक माध्यमातून संदेश प्रसारित झाल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
(सौजन्य : abp माझा)
सभेनंतर कार्यकर्त्यांनी सालीपुरा भागातही जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सालीपुरा भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही अफेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांना या वेळी कुणी आक्षेपही घेतला नाही.
ओवैसी यांच्या भाषणाच्या वेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या नाहीत’, असे ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाहिंदूंवर लाठीमार करणारे पोलीस अशा वेळी शांत असतात, हे लक्षात घ्या ! |