पावसाळ्‍यामध्‍ये शरिरातील अग्‍नीचे, पचनशक्‍तीचे रक्षण होण्‍यासाठी मित जेवावे, तसेच अधूनमधून उपवास करावा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २०७

‘सततच्‍या पावसामुळे शरिरातील अग्‍नी, पचनशक्‍ती मंद होतेे. अग्‍नी मंद झाल्‍याने सर्दी, खोकला, ताप यांसारखे विकार होतात. पावसाळ्‍यात अग्‍नी चांगला रहाण्‍यासाठी पोटभर जेवणे टाळावे. थोडीशी भूक शिल्लक ठेवून जेवावे. सकाळी भूक लागत नसल्‍यास अल्‍पाहार न करता थेट दुपारी जेवावे. आठवड्यातून एकदा रात्रीचे जेवण टाळून काही न खाता उपवास करावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२३)