विदेश यात्रा सोयीस्कर होण्यासाठी अल्प काळात मिळणार पारपत्र ! – परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा
नवी देहली – विदेशात जाण्यासाठी लागणारे पारपत्र मिळवण्यासाठी शक्यतो पुष्कळ वेळ जातो; परंतु आता परराष्ट्र मंत्रालयाने याची प्रक्रिया सोपी केली आहे. यामुळे आता अल्प वेळेतच पारपत्र मिळू शकेल. या प्रक्रियेमुळे इच्छुकांना ‘ई-पासपोर्ट’ मिळणार आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ‘पासपोर्ट सेवा दिवसा’निमित्त ही घोषणा केली. ते म्हणाले की, याद्वारे लोकांना अतिशय सहज आणि अद्ययावत् पारपत्र मिळू शकेल. लोकांना वेळेत, विश्वासार्ह, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पारपत्र सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कुत्रिम बुद्धीमत्ता) या तंत्रज्ञानाचेही साहाय्य घेतले जाणार आहे.
एस जयशंकर ने पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0, ई-पासपोर्ट को लेकर की बड़ी घोषणा https://t.co/mzXLMJc6l2 pic.twitter.com/leZqP9Fx37
— NDTV India feed (@ndtvindiafeed) June 24, 2023
‘ई-पासपोर्ट सेवा २.०’ असे पारपत्र देण्याच्या या पुढील टप्प्याच्या योजनेचे नाव असून या सेवेचे सॉफ्टवेअर ‘आयआयटी कानपूर’, तसेच केंद्र सरकारच्या ‘एन्.आय.सी.’ म्हणजेच ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ या संस्थेने विकसित केले आहे.