दापोलीतील भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू
रत्नागिरी – २५ जून या दिवशी दापोली तालुक्यातील आसूद जोशीआळी येथे ट्रक आणि खासगी मॅक्झिमो वडाप गाडीची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ लहान मुलांचाही समावेश आहे. तर ४ जण गंभीर घायाळ झाले आहेत. यामध्ये वडाप गाडीचा चालक अनिल सारंग यांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरीत भीषण अपघात
दोन लहान लेकरांसह पाच जणांचा जागीच मृत्यू#accident https://t.co/oaRnHUpMuy— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 25, 2023
खाजगी प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी दापोलीकडून हर्णेकडे जात होती. अपघातातील सर्व लोक आंजर्ले, अडखळ आणि पाजपंढरी या गावांतील प्रवासी असल्याचे समजत आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दापोली पोलीस दाखल झाले होते. स्थानिकांच्या साहाय्याने अनेकांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. काही घायाळांना मुंबईला हालवण्यात आले आहे.