अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) येथे रस्त्यावर नमाजपठण करणार्यांना होणार दंड !
अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) – येथील महामार्गांवर वाहने थांबवून नमाजपठण किंवा अन्य कृती करणार्यांना १ सहस्र दिरहाम (२२ सहस्र ३१४ रुपये) दंड आकारण्यात येणार असल्याचा आदेश पोलिसांकडून देण्यात आला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, रस्त्यांवर नमाजपठण किंवा अन्य कोणतीही कृती लोकांसाठी आणि नमाजपठण करणार्यांसाठी धोकादायक आहे. या संदर्भात पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे.
UAE: Praying on side of roads will invite a fine of Dh1,000.
Motorists who stop their vehicles in undesignated places on the highways to offer prayers will be fined Dh1,000 as the practice poses dangers to them and other road users- Abu Dhabi Police. pic.twitter.com/9MWeOisX1N
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) June 20, 2023
१. अबुधाबी वाहतूक विभागाचे उपमहासंचालक ले. कर्नल सलाह अब्दुल्ला अल् हमैरी यांनी सांगितले की, लोकांनी विश्रांतीगृह, पेट्रोलपंप, मशीद आदी ठिकाणी जाऊन नमाजपठण करावे, रस्त्याच्या कडेला नमाजपठण करू नये.
२. अबुधाबीच्या पोलीस महासंचालकांचे म्हणणे आहे की, लोक रस्त्यांवर वाहने थांबवून नमाजपठण किंवा अन्य कामे करतात. यामुळेच हा आदेश जारी करण्यात आला आहे.
३. रस्त्याच्या कडेला गाडी उभी करणे, चौकामध्ये वाहन थांबवणे, चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करणे, गाडी रस्त्यावर बिघडल्यास सुरक्षेचे उपाय न करणे आदींसाठी दंड आकारण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाइस्लामी देशांमध्ये असा नियम होऊ शकतो, तर धर्मनिरपेक्ष भारतात का होऊ शकत नाही ? असा नियम बनवण्यासाठी भारतियांनी पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्यावर दबाव आणला पाहिजे ! |