भागलपूर (बिहार) येथे महंमद कुरेशी याच्या घरातील अज्ञात स्फोटात १ जण ठार
५ किलोमीटरपर्यंत ऐकू आला आवाज !
भागलपूर (बिहार) – येथील महमंद बडुल कुरेशी याच्या घरात मोठा स्फोट हेऊन संपूर्ण घर कोसळले. यात एक जण ठार, तर ३ जण घायाळ झाले आहेत. मृत व्यक्ती कुरेशी याचा मुलगा आहे, तर घायाळ झालेल्यांपैकी एक जण कुरेशी याची पत्नी आहे. हा स्फोट इतका प्रचंड होता की, याचा आवाज ५ किलोमीटरपर्यंत ऐकू आला. तसेच शेजारील घरांचीही हानी झाली. पोलिसांनी या स्फोटाच्या घटनेची चौकशी चालू केली आहे. हा स्फोट नेमका कशाचा होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. काही जणांनी हा स्फोट बाँबचा, तर काही जणांनी सिलेंडरचा असल्याचे म्हटले आहे.
1 killed, 3 injured in bomb explosion in #Bihar’s Bhagalpur @NewsroomOdisha https://t.co/PnSmBFDnsp
— Newsroom Odisha (@NewsroomOdisha) June 25, 2023