१२ वीच्या परीक्षेमध्ये पुणे येथील कु. सहर्षा सचिन मुदकुडे हीचे सुयश !
पुणे – येथील सनातनची साधिका कु. सहर्षा सचिन मुदकुडे हिला १२ वी ‘कॉमर्स’ला ‘बोर्डा’च्या परीक्षेत ८४.३३ टक्के प्राप्त झाले आहेत. परीक्षेत मिळालेले यश गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) कृपेमुळे मिळाले आहे, असा तिचा भाव आहे. पुण्यातील ‘हुजूरपागा ज्युनियर कॉलेज’मध्ये तिने शिक्षण घेतले आहे.
कु. सहर्षा हिने तिच्या यशाविषयी बोलतांना सांगितले की, गुरुदेवांच्या कृपेने परीक्षेच्या वेळी मला कुठलाही ताण जाणवला नाही. परीक्षेच्या कालावधीतही गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाता येत होते. गुरुदेवांनी सुचवल्याप्रमाणे अभ्यास केल्याने तेच प्रश्न परीक्षेत आले आणि अवघड विषयाचा पेपर सोपा गेला. माझे प्रार्थना, कृतज्ञता, नामजप करणे, भावाचे प्रयत्न करणे, गुरुस्मरण असे प्रयत्न सध्या चालू आहेत, तसेच बालसाधकांचा आढावा घेणे, युवा साधक आढावा शीट भरणे या सेवा गुरुदेवांच्याच कृपेने होत आहेत. गुरुदेवांच्याच कृपेने १२ वी बोर्डात चांगले गुण मिळाले याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.