बांकुरा (बंगाल) येथे २ मालगाड्यांच्या धडकेने १२ डबे घसरले !
रेल्वे स्थानकावर उभ्या असणार्या मालगाडीला मागून आलेल्या दुसर्या मालगाडीने दिली धडक !
बांकुरा (बंगाल) – येथील ओंडा रेल्वेस्थानकावर २ मालगाड्यांची धडक झाल्याने इंजिनसमवेत मालगाडीचे १२ डबे रुळावरून घसरले. या घटनेत मालगाडीचा मोटरमन गंभीरित्या घायाळ झाला आहे. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. पहाटे ४ वाजता ही घटना घडली.
Train Accident: पश्चिम बंगाल में दो मालगाड़ियों की टक्कर, 12 डिब्बे पटरी से उतरे #train #westbengal #trainaccident #indianrailway #पश्चिमबंगाल #रेलहादसा #भारतीयरेल https://t.co/m8SjhcfuVN
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) June 25, 2023
या रेल्वे रुळावर आधीपासूनच एक मालगाडी उभी होती. या वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या एका मालगाडीने उभ्या असलेल्या मालगाडीला मागून जोरदार धडक दिली. कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात साधारण अशाच प्रकारे झाला होता. या अपघातामुळे पुन्हा ‘२ रेल्वेगाड्या एकाच रुळावर कशा आल्या ?’, हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. (याचे उत्तर सरकारने जनतेल देणे अपेक्षित आहे ! – संपादक)