मथुरेतील राधाराणी मंंदिरात तोकड्या कपड्यांत येणार्यांवर बंदी
मथुरा (उत्तरप्रदेश) – मथुरा जिल्ह्यातील बरसाना येथे असलेल्या राधाराणी मंदिरात तोकडे कपडे, उदा. शॉर्ट्स, नाईट सूट, मिनी स्कर्ट, हाफ पँट, बर्मुडा आदी परिधान करून येण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. तशी सूचना मंदिराबाहेर लावण्यात आली आहे. या नियमाची कार्यवाही एक आठवड्यानंतर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे पदाधिकारी रासबिहारी गोस्वामी यांनी दिली. काही मासांपूर्वी राज्यातील राधा दामोदर मंदिर, तसेच बदायू जिल्ह्यातील बिरुआ बाडी मंदिर येथेही असा नियम लागू करण्यात आला आहे.
मथुरा के राधा रानी मंदिर में ड्रेस कोड लागू: हाफ पेंट, कटी-फटी जीन्स सहित छोटे कपड़े पहनकर आने पर प्रतिबंध; पुजारी बोले- पारंपरिक कपड़े पहनकर आएंhttps://t.co/iYFqGCFhur #Mathura pic.twitter.com/AW6E1A63Cb
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 23, 2023
भाविकांनी कोणत्या पेहेरावात यावे याविषयी देशातील अनेक मंदिरांनी नियम केले आहेत. आम्हीही त्यांच्या प्रमाणेच निर्णय घेतला आहे, असे उत्तरप्रदेशातील मंदिरांच्या प्रशासनांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकादेशातील प्रत्येक मंदिरात अशी बंदी घालण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाही प्रारंभ केला पाहिजे ! |