देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६८ वर्षे) वाहनशुद्धीची सेवा करत असतांना अनुभवत असलेली भावस्थिती !
१. प.पू. भक्तराज महाराज यांच्या वाहनातील तैलचित्राला शाल पांघरलेली पाहून पुष्कळ वेळ भावस्थिती अनुभवणे
‘११.११.२०२२ या दिवशी देवद आश्रमातील वाहनशुद्धीची सेवा करत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या वाहनाची शुद्धी करायला गेलो. त्या वेळी त्या वाहनातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या तैलचित्राला शाल पांघरलेली पाहून ‘साधक किती भावाच्या स्थितीत राहून सेवा करतात ! ‘प्रत्यक्ष बाबा तिथे आहेत’, असा त्यांचा भाव असतो. त्यांना थंडी वाजू नये, यासाठी त्यांच्या अंगावर घातलेली शाल पाहून मला हमसाहमशी रडू आले. या वेळी मी बर्याच कालावधीसाठी भावावस्थेत होतो.
२. सद्गुरु राजेंद्र शिंदेदादा प.पू. भक्तराज महाराजांच्या तैलचित्राला शाल पांघरून येत असतांना ‘प्रत्यक्ष प.पू. भक्तराज महाराजच गाडीतून उतरून दर्शन देण्यासाठी येत आहेत’, असे जाणवून भावजागृती होणे
दुसर्या दिवशी, म्हणजे १२.११.२०२२ या दिवशी वाहनशुद्धीसाठी प.पू. भक्तराज महाराज यांच्या वाहनाजवळ जात असतांना माझ्या समोरून सद्गुरु राजेंद्र शिंदेदादा वाहनातील प.पू. भक्तराज महाराजांच्या तैलचित्राला शाल पांघरून येतांना मला दिसले. त्यांचे रूप पाहून ‘प्रत्यक्ष प.पू. भक्तराज महाराजच गाडीतून उतरून मला दर्शन देण्यासाठी येत आहेत’, असे मला जाणवले आणि माझी पुष्कळ भावजागृती झाली.
३. प.पू. डॉक्टर यांच्या संदर्भातील भावावस्था
‘प.पू. डॉक्टर, आपल्या नुसत्या आठवणीने माझे उर भरून येते आणि ‘आपल्या कुशीत शिरून पुष्कळ अश्रू ढाळावे’, असे वाटते. ही भावावस्था बराच वेळ टिकून रहाते. आपण माझ्या पाठीशी रहावे आणि मला आपल्या चरणांशी स्थान द्यावे, अशी आपल्या सुकोमल चरणी भावपूर्ण प्रार्थना !’
– श्री. बाळासाहेब विभूते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |