चराचरात असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे अस्तित्व दाखवून भावाचे महत्त्व लक्षात आणून देणे
‘प्रवासात असतांना निसर्गाकडे पहात असतांना ‘चराचरात प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व आहे, पंचमहाभूतांवर त्यांचेच प्रभुत्व आहे, पावसाच्या प्रत्येक थेंबात तेच आहेत, वृक्ष, नदी, पर्वत सर्व ठिकाणी तेच आहेत’, असे विचार येऊन माझी भावजागृती झाली.
गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘जसे पंचमहाभूतांवर आपले प्रभुत्व आहे, पंचमहाभूते जशी आपल्या नियंत्रणात आहेत, तसेच माझ्यावर आपलेच प्रभुत्व असू दे. माझी प्रत्येक कृती, विचार आपल्याच नियंत्रणात राहू दे.’ त्यानंतर भावजागृती होऊन आनंद मिळू लागला. या सर्वांतून गुरुदेवांनी भावाचे महत्त्व लक्षात आणून दिले आणि वरील ओळी त्यांनीच लिहून घेतल्या. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे (वय ५४ वर्षे), मंगळुरू सेवाकेंद्र, कर्नाटक. (७.७.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |