रशियामध्ये ‘वॅगनर ग्रुप’ सैन्याची बंडखोरी
वॅगनर ग्रुपचे सैनिकांनी रोस्तोव्ह शहर घेतले कह्यात !
मॉस्को (रशिया) – रशियाचे खासगी सैन्य असलेल्या ‘वॅगनर ग्रुप’ने रशियाच्या विरोधात बंडखोरी केली आहे. या सैन्याच्या २५ सहस्र सैनिकांनी रोस्तोव्ह शहर कह्यात घेतले आहे. या सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोजीन यांनी ‘आम्ही मॉस्कोकडे मार्गस्थ करत आहोत. आमच्या मार्गात येणार्यांना धडा शिकवण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे. दुसरीकडे मॉस्को येथे अतिदक्षतेची चेतावणी देण्यात आली असून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे घर, कार्यालय, संसद येथे सैन्याची अधिक कुमक तैनात करण्यात आली आहे. तसेच रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत. वॅगनर ग्रुपने बंड केल्यामुळे रशियात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रिगोजीन यांनी युक्रेनमधील वॅगनरच्या प्रशिक्षण शिबिरावर पुतिन यांच्या सांगण्यावरून क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केल्याचा आरोप कला होता. त्यानंतर प्रियोजीन यांच्यावर रशियाने कारवाई चालू केली होती. क्षेपणास्त्राच्या आक्रमणात वॅगनरचे अनेक सैनिक ठार झाले होते. त्यामुळे चिडलेल्या प्रिगोजीन यांनी रशियाच्या विरोधात बंड पुकारले आहे.
(सौजन्य : Zee News)
१. प्रिगोजीन यांनी दावा केला आहे की, त्यांचे सैनिक रशियाच्या सीमेत घुसले आहेत आणि त्यांनी रशियाच्या सैन्याचे एक हेलिकॉप्टरही पाडले आहे. त्यांच्या सैन्याने रोस्तोव्ह शहरातील अनेक स्थाने कह्यात घेतली आहेत.
२. प्रिगोजीन म्हणाला की, आमच्याकडे २५ सहस्र सैनिकांची फौज आहे. आम्ही आमचे ध्येय निश्चित केले आहे आणि आम्ही मरण्यास सिद्ध आहोत. आम्ही आमची मातृभूमी आणि रशियाचे नागरिक यांच्यासाठी उभे आहोत.
३. प्रिगोजीन यांनी म्हटले आहे की, आमच्या सैनिकांनी दक्षिण सीमा क्षेत्रात प्रवेश केला आहे. आम्ही दक्षिणेकडील जिल्हा प्रशासनाच्या इमारती कह्यात घेतल्या आहेत.
४. वॅगनर ग्रुपच्या बंडामुळे रशियातील वातावरण बिघडले असून ‘नागरिकांनी घरातच रहावे बाहेर पडू नये’, असे आवाहन रशियाच्या प्रशासकीय अधिकार्यांकडून करण्यात येत आहे.
(सौजन्य : Zee 24 Taas)
वॅगनर ग्रुप काय आहे ?‘वॅगनर ग्रुप’ ही रशियातील निमलष्करी संघटना आहे. ही खासगी संघटना आहे. या संघटनेत कार्यरत असणारे सैनिक रशियन कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कार्य करतात. वर्ष २०१४ मध्ये अशा प्रकारे सैनिकांची संघटना कार्यरत असल्याची माहिती जगासमोर आली. या संघटनेने युक्रेनमध्ये कार्यरत असलेल्या फुटीरतावादी शक्तींना पाठिंबा दिला होता. |
‘वॅगनर ग्रुप’ने आमच्या पाठीत वार केला ! – पुतिन
मॉस्को (रशिया) – रशियाच्या खासगी सैन्याने म्हणजे वॅगनर ग्रुपने बंड केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी देशाला संबोधित केले. त्यांनी म्हटले की, आम्ही आमच्या देशाला अंतर्गत बंडखोरीपासून वाचवू. वॅगनरने आमच्या पाठीत वार केला आहे. त्याने सैन्याला आव्हान दिले आहे. खासगी सैन्याने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचे रक्षण करू.रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने वॅगनर ग्रुपचा प्रमुख प्रिगोजीन यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. प्रिगोजीन याला या गुन्ह्यासाठी २० वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते.
प्रिगोजिन याने बंड का केले ?
रशियाकडून येवनेगी प्रिगोजिन यांचे वॅगनर ग्रुपचे सैन्य युक्रेनमध्ये लढत आहे. काही दिवसांपूर्वी प्रिगोजिन यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे रशियाच्या संरक्षण मंत्रालयावर आरोप केला होता की, तो त्यांच्या ग्रुपच्या सैनिकांना पुरसे शस्त्र आणि साहित्य उपलब्ध करत नाही. त्यानंतर रशियाने वॅगनरच्या सैनिकांवर क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने यांद्वारे आक्रमणे केले. यात त्यांचे अनेक सैनिक ठार झाले. या घटनेनंतर प्रिगोजिन यांनी आरोप केला की, रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई सोइगु हे रशियाच्या सैन्याधिकार्यांशी हातमिळवणी करून वॅगनर ग्रुपच्या सैन्याला नष्ट करू पहात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रिगोजिन यांनी हे बंड केले आहे.
कोण आहे येवगेनी प्रिगोजिन ?येवगेनी प्रिगोजिन यांचा जन्म वर्ष १९६१ मध्ये रशियाच्या लेनिनग्राड शहरात झाला. वर्ष १९८१ मध्ये प्रिगोजिन यांना मारहाण, दरोडा आणि फसवणूक या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात येऊन त्याला १३ वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. ९ वर्षे कारावास भोगल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर त्यांनी खाद्यपदार्थांचे विक्री केंद्र चालू केले होते. काही काळाने त्यांनी एक उपाहारगृह चालू केले. ते पुष्कळ प्रसिद्ध झाले. येथेच त्याची भेट राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी झाली. यानंतर प्रिगोजिन यांनी खाद्यपदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय चालू केला. त्यांना रशियाचे सैन्य आणि शाळेचे मुले यांना जेवण देण्याचे कंत्राट मिळू लागले. हे कंत्राट पुतिनमुळेच त्यांना मिळाले. यानंतर त्यांनी रशियाच्या समर्थनार्थ ‘वॅगनर ग्रुप’ नावाचे खासगी सैन्य उभारले. यात निवृत्त सैन्याधिकारी, सैनिक, गुन्हेगार आदींचा समावेश करण्यात आला. या सैन्याला पुतिन यांनी सीरिया, लिबिया, माली आणि आफ्रिका खंडातील युद्धासाठी पाठवले होते. युक्रेन युद्धातही या सैन्याला तैनात करण्यात आले. यामुळे प्रिगोजिन यांना पुतिन यांचे उत्तराधिकारी या दृष्टीने पहाण्यात येऊ लागले होते. |