एकाच वेळी ३ टोमॅटोंचे घोस लागून सनातनच्‍या ३ गुरूंचे स्‍मरण करून देणारे कोल्‍हापूर सेवाकेंद्रातील टोमॅटोचे झाड !

१. कोल्‍हापूर येथील सनातनच्‍या सेवाकेंद्रात लावलेल्‍या टोमॅटोच्‍या छोट्या रोपाला पू. भाऊ परब यांनी  नियमित पाणी घातल्‍यावर त्‍याला दोन मासांनंतर एकाच वेळी ३८ टोमॅटो लागणे !

पू. सदाशिव (भाऊ) परब

‘कोल्‍हापूर येथील सनातनच्‍या सेवाकेंद्राच्‍या बाहेरच्‍या बाजूला टोमॅटोचे एक छोटेसे रोप आले होते. ते तिथून काढून आणून सेवाकेंद्रातील आगाशीत एका टबमध्‍ये लावले. पू. भाऊकाका (पू. सदाशिव (भाऊ) परब, सनातनचे २६वे समष्‍टी संत, वय ८२ वर्षे) त्‍याला प्रतिदिन पाणी घालतात. दोनच मासांत त्‍या झाडाला एकाच वेळी ३८ टोमॅटो लागले.

२. सनातनच्‍या तीन गुरूंचे स्‍मरण करून देणारे ३ टोमॅटोंचे घोस !

कु. माधुरी दुसे

वैशिष्‍ट्यपूर्ण गोष्‍ट म्‍हणजे त्‍या झाडाला ‘३ टोमॅटोंचा एक घोस’, असे टोमॅटोंचे घोस लागले आहेत. ते घोस सनातन संस्‍थेच्‍या तीन गुरूंचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) स्‍मरण करून देतात.

काल पू. भाऊकाका म्‍हणाले, ‘‘हे ‘न भूतो न भविष्‍यति ।’, असे आले आहे.’’

– कु. माधुरी दुसे, कोल्‍हापूर सेवाकेंद्र (१७.२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक