चंद्रपूर येथे ७ वर्षांच्‍या मुलाच्‍या आधारकार्डवर उपमुख्‍यमंत्र्यांचे छायाचित्र !

प्रशासनाचा अक्षम्‍य हलगर्जीपणा !

प्रशासनाकडून चूक दुरुस्‍त

प्रतीकात्मक छायाचित्र

चंद्रपूर – येथील ७ वर्षांच्‍या मुलाच्‍या आधारकार्डवर राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे. संबंधित मुलाच्‍या कुटुंबियांनी हे छायाचित्र पालटून घेण्‍यासाठी आधार केंद्रात संपर्क साधला. त्‍यानंतर प्रशासनाने चूक दुरुस्‍त केली, तसेच अशी चूक करणार्‍या एजन्‍सीची चौकशी करून कारवाई करणार असल्‍याचेही सांगितले जात आहे.

चंद्रपूर येथील चिमूरचे तहसीलदार म्‍हणाले, ‘‘संबंधित मुलाचे छायाचित्र काढतांना त्‍याच्‍या मागे देवेंद्र फडणवीस यांचे पोस्‍टर होते. छायाचित्र काढतांना तो मुलगा हलल्‍याने चुकून फडणवीस यांचे छायाचित्र आधारकार्डवर आले.’’