माहीममध्ये अज्ञातांनी औरंगजेबासह प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असलेले फलक लावले !
मुंबई – माहीम परिसरात अज्ञातांनी उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेब यांचे वादग्रस्त मजकुरासह एकत्रित छायाचित्र असलेले फलक मध्यरात्री लावले होते. सकाळी स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ हे फलक हटवले. या फलकांवर ‘औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे…!’ असा आक्षेपार्ह मजकूर होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार प्रविष्ट करण्यात आलेली नाही. कुणीतरी हा खोडसाळपणा केल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणी स्वत:हून अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार प्रविष्ट करणार आहेत.