शाळेमध्ये तंबाखू, मद्य सेवन केल्यास त्वरित कारवाई !
शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
पुणे – शाळेत, आवारामध्ये तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य बागळणे, सेवन करणे यांवर बंदी घालण्यात आली आहे. असे कुणी करतांना आढळल्यास त्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे.
शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यावर सेवेचे आणि वर्तनाचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन चाचणी घेण्यात येईल. वर्तनात कसूर केल्यास सुधारणेची नोटीस दिली जाईल. सुधारणा न झाल्यास ६ मास जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत पाठवण्यात येईल. तरीही सुधारणा न झाल्यास ५० टक्के वेतनावर पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. अंतिमत: सुधारणा न झाल्यास सक्षम अधिकारी कारवाई करतील.
संपादकीय भूमिकामेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे असे निर्णय घ्यावे लागत आहेत, हे दुर्दैवी ! यासाठी शाळांमध्ये गुरुकुल शिक्षणपद्धतच हवी ! |