पावसाळ्यामध्ये वातावरणात, तसेच शरिरात होणारे पालट
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २०६
‘पावसाळा चालू झाल्यावर वातावरणात एकाएकी थंडावा निर्माण होतो. पावसाचे पाणी उंचावरून, वरच्या भागातून वाहून सखल भागांमध्ये येऊन साठते. या पाण्यामध्ये माती, तसेच अन्य प्रदूषित घटक मिसळलेले असतात. यामुळे पाणी प्रदूषित होते. वातावरणातील या पालटांमुळे शरिरामध्ये वात आणि पित्त वाढतात. सततच्या पावसाने, तसेच ढगाळ वातावरणामुळे शरिरातील अग्नी (पचनशक्ती) मंद होतो. यामुळे पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, तसेच साथीचे विकार यांत वाढ झालेली पहायला मिळते. वातावरणातील थंडाव्यामुळे सांधेदुखी, हातपाय आखडणे यांसारखे त्रासही बळावतात. ओलसरपणामुळे त्वचेवर बुरशीजन्य विकार (फंगल इन्फेक्शन) होण्याची शक्यता वाढते. या काळात आरोग्य राखण्यासाठी काय करावे, हे पुढच्या भागांमध्ये पाहू.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan