श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कौंडण्यपूर (अमरावती) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी केली प्रार्थना !
अमरावती – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणीमातेचे जन्मस्थान कौंडण्यपूर या ठिकाणी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात, तसेच श्री अंबिकामाता मंदिरात ‘हिंदु राष्ट्र स्थापना व्हावी, काशी ज्ञानव्यापी आणि श्रीकृष्णजन्मभूमी खटल्याचा निर्णय हिंदूंच्या बाजूने लागावा’, यासाठी दर्शन घेऊन प्रार्थना केली. या वेळी तेथील भक्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विजय डहाके यांनी मंदिराचा इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व यांविषयी माहिती दिली, तसेच ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या पावन पदस्पर्शाने मंदिर, तसेच आसपासच्या भागातील हिंदूंच्या समस्या लवकर दूर होवो आणि माझ्या हातून सदैव प्रामाणिकपणाने कार्य होऊन मला सदैव चांगले कार्य करण्याचीच प्रेरणा मिळो’, अशी श्री. डहाके यांनी त्यांच्या चरणी प्रार्थना केली.
या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री. अमाळकर, सचिव श्री. सदानंद साधू, विश्वस्त श्री. अशोक पवार यांची उपस्थिती होती.
क्षणचित्रे
१. कडक ऊन असतांनाही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मंदिरात प्रवेश केल्यावर मधे मधे आभाळ येऊन ऊन आपोआप अल्प होत होते.
२. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानच्या वतीने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान करण्यात आला.