पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी ‘सेवेतील अडचणी न मांडणे’ यामागील स्‍वभावदोष आणि अहंचे पैलू उलगडून दाखवल्‍यावर त्‍याविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करणारे श्री. विनायक आगवेकर !

उद्या २५.६.२०२३ (आषाढ शुक्‍ल सप्‍तमी) या दिवशी श्री. विनायक आगवेकर यांचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

पू. (सौ.) अश्विनी पवार

श्री. विनायक आगवेकर यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा !

श्री. विनायक आगवेकर

१. पू. (सौ.) अश्‍विनी पवार घेत असलेल्‍या व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्‍यात ‘साधकांनी त्‍यांच्‍या सेवेतील अडचणी न मांडणे’ या विषयावर झालेले चिंतन !

‘२४.१.२०२३ या दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेत होते. श्री. विनायक आगवेकर (वय ४५ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के) यांचा आढावा चालू असतांना स्‍वभावदोषांच्‍या सूत्रावर चिंतन आणि चर्चा चालू होती. ‘साधक स्‍वतःला आलेल्‍या अडचणी सोडवण्‍यासाठी संबंधितांना विचारून उपाययोजना काढत नाहीत आणि स्‍वतःच्‍याच स्‍तरावर काही तडजोड करून सेवा करत रहातात. साधक तडजोड करत रहातात, म्‍हणजे ‘अडचणीवर उपाय निघू शकेल’, या विचारापर्यंत पोचत नाहीत. त्‍या वेळी ‘आहे त्‍या परिस्‍थितीतच सेवा करावी लागेल’, असा त्‍यांचा विचार असतो. त्‍याचबरोबर ‘माझा जो परिस्‍थितीचा अभ्‍यास झाला आहे, तो बरोबरच आहे’, असा साधकांच्‍या अहंचा भागही असतो, म्‍हणजे ‘मला वाटते ते बरोबर, मी करतो तेच योग्‍य’, हे त्‍या साधकांच्‍या अहंचे पैलू असतात. त्‍यामुळे ‘या परिस्‍थितीत वेगळी काहीतरी उपाययोजना असू शकते’, असा विचार करून जिज्ञासूपणे आणि शिकण्‍याच्‍या वृत्तीत राहून तो पुढे अडचण मांडत नाही.’

२. आढाव्‍यात लहान चुकांचा अभ्‍यास करण्‍याची आवश्‍यकता लक्षात येऊन स्‍वभावदोष समजल्‍यावर विनायकदादांना कृतज्ञता वाटणे

हे सर्व ऐकल्‍यावर विनायकदादा म्‍हणाले, ‘‘आम्‍ही मोठ्या मोठ्या चुकांचा अभ्‍यास करतो; पण लहान चुकांचा अभ्‍यास करत नाही. अशा अनेक लहान चुका होत असतात आणि या लहान चुकांमध्‍येच आपल्‍यातील तीव्र स्‍वभावदोष आणि अहंचे पैलू दडलेले असतात.’’

व्‍यष्‍टी साधनेचा आढावा झाल्‍यानंतर विनायकदादांच्‍या डोळ्‍यांत कृतज्ञतेचे अश्रू आले. दादा म्‍हणाले, ‘‘आढाव्‍यात एवढ्या बारकाव्‍यानिशी सर्व सांगितल्‍यामुळे मला माझे स्‍वभावदोष आणि अहंचे पैलू कळले. त्‍यामुळे मला कृतज्ञता वाटली.’’

– (पू.) सौ. अश्‍विनी अतुल पवार (सनातनच्‍या ६९ व्‍या संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.२.२०२३)