आतंकवादी झाकीर नाईक याच्याकडून महसूलमंत्र्यांच्या संस्थेला कोट्यवधींचे साहाय्य !
खासदार संजय राऊत यांचा आरोप
मुंबई – राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला आतंकवादी झाकीर नाईक याच्याकडून साडेचार ते पाच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य्य मिळाले असून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने गुन्हा नोंद करून अन्वेषण करावे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती नसेल, तर आम्ही माहिती द्यायला सिद्ध आहोत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (शासनाने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे ! – संपादक) राऊत यांनी मंत्री ‘दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या नावाखाली १७८ कोटी रुपये गोळा केले आहेत. या प्रकरणी ईडीकडे तक्रार देऊन सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहे’, तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी राहुल कुल यांच्या भीमा पाटस कारखान्यात ५०० कोटींचा अवैध आर्थिक व्यवहार झाला असून याविषयी ईडीकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.