बाडमेर (राजस्थान) येथे पोलीस हवालदाराने युवतीला मद्य पाजून केला बलात्कार !
बाडमेर (राजस्थान) – येथील हवालदार जीवाराम याने एका युवतीवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडिता २० जूनच्या रात्री एका दुकानात दही घेण्यासाठी गेली असता जीवारामने दुकानाचा दरवाजा अचानक बंद करून तिला पोलिसी खाकीचा धाक दाखवत धमकावले. तिला मद्य प्यायला लावून तिच्यावर बलात्कार केला. तसेच यासंदर्भात कुणाला सांगण्याचा प्रयत्न केल्यास खोट्या प्रकरणात फसवून अटक करण्याची भीतीही दाखवली. पीडितेने न घाबरता पोलिसात तक्रार प्रविष्ट केली. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून घेतला असून हवालदाराला अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमधील पोलिसांची वासनांधता लांच्छनास्पद ! महिलांची कैवारी असल्याचा आव आणणार्या प्रियांका गांधी-वढेरा यांना आता काय म्हणायचे आहे ? |