वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातील विविध क्षणांचा छायाचित्रमय वृत्तांत
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात १६ ते २२ जून हे ७ दिवस विविध माध्यमांतून हिंदु राष्ट्र स्थापनेचा जागर करण्यात आला. राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या संदर्भात विविध माध्यमांतून जागृती करण्यात आली. देश-विदेशातील हिंदुत्वनिष्ठ एकमेकांना भेटल्यामुळे सर्वांची एकमेकांशी जवळीक झाली. संतांच्या वंदनीय उपस्थितीमुळे हिंदुत्वनिष्ठांना संतांचे मार्गदर्शन लाभले. तसेच एकमेकांच्या अनुभवांतून भरभरून शिकता आले. ‘हिंदु राष्ट्राकडून हिंदु विश्वापर्यंत या ‘सेल्फी पाईंट’सारख्या अभिनव उपक्रमांमुळे अधिवेशनाचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रसार झाला !
या अधिवेशनात भारतात धर्मांधांकडून प्रतिदिन लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदु युवतींची केली जाणारी फसवणूक आणि ख्रिस्त्यांकडून गरीब हिंदूंचे केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेला धर्मांतरविरोधी कायदा, काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी ‘पनून काश्मीर’ हे स्वतंत्र राज्य निर्माण करणे, देशात निर्माण होत असलेली ‘हलाल जिहाद’रूपी समांतर अर्थव्यवस्था रोखण्यासाठी करावयाची उपाययोजना आणि भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासह संपूर्ण जगभरात ‘हिंदु विश्व’ करण्यापर्यंत अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
भिन्न प्रांत भिन्न भाषा, तरी मार्ग एकच हिंदु राष्ट्राचा !
क्षात्रतेजाचे वरदान लाभले । ब्राह्मतेजाचा जाहला आविष्कार ॥
नारीशक्ती एकवटली कराया । हिंदु राष्ट्राचा जयजयकार ॥
अबला नव्हे, सबला तुम्ही । केवळ नारी नसे, देवीरूप तुम्ही ॥
चैतन्यमयी वाणी तुमची । हिंदु राष्ट्राची ग्वाही देते ॥
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ॥