अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांना काही संघटनांकडून करण्यात येत आहे विरोध !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या ४ दिवसांच्या दौर्यावर असणार्या पंतप्रधान मोदी यांचे प्रचंड स्वागत होत असतांना त्यांना विरोधही केला जात आहे. काश्मीरचा प्रश्न, शेतकरी आंदोलन, अल्पसंख्यांकांवर होणारी कथित आक्रमणे, मानवाधिकार कायद्यांची कथित पायमल्ली आदी सूत्रांवरून अमेरिकेतील विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोदी यांचा रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. आंदोलनकर्त्या नागरिकांनी ‘मोदी परत जा’ ‘मोदी यांचे स्वागत नाही’ अशा प्रकारचे फलक घेऊन विरोध केला. न्यूयॉर्क येथील ‘देसीस रायझिंग अप अँड मुव्हिंग’, ‘हिंदुज फॉर ह्युमन राइट्स’, ‘क्वीन्स अगेन्स्ट हिंदू फॅसिझम्’ आणि ‘वर्ल्ड सिख पार्लिमेंट’ अशा संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की स्टेट विज़िट का अमेरिका में कौन कर रहा है विरोध https://t.co/BRH1dlrm66
— BBC News Hindi (@BBCHindi) June 22, 2023
या नागरिकांचे म्हणणे आहे की, मोदी हा पूर्वेतील उगवता हिटलर आहे. बायडेन यांनी मोदींच्या हुकूमशाहीला खतपाणी घालणे थांबवावे. पंतप्रधान मोदी अल्पसंख्यांकांना मारणे थांबवा, मोदी हे मारेकरी आहेत, हिंदुत्व हे हिंदूंचे वर्चस्व आहे. पोलिसांकडून शेतकर्यांवर होणारे अत्याचार थांबवा, अन्यायकारक शेतकरी कायदे मागे घ्या, भारतीय आतंकवादाचा चेहरा मोदी, अशी असंख्य भित्तीपत्रके घेऊन नागरिक अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.