वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले हृद्य मनोगत
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले हृद्य मनोगत
१. ‘यापूर्वी ‘हिंदू एकत्र येऊ शकत नाही’, असे आम्हाला वाटत होते; मात्र येथे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला आल्यावर विविध प्रांतांमधील हिंदुत्वनिष्ठ येथे एकत्र आल्याचे पाहून हिंदू एकत्र येऊ शकतात, याची खात्री झाली.’ – अधिवक्ता देवेंद्र सिंह, पूर्व जिल्हाधिकारी, विश्व हिंदु परिषद, सहारनपूर, उत्तरप्रदेश.
२. ‘सर्व हिंदूंनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व शक्तीनिशी कार्य केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही. देशात हिंदुत्वाचे वातावरण निर्माण होत आहे. हिंदूविरोधी शक्ती हिंदूंना तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र हिंदूंच्या संघटनामुळे त्यांचे कार्य विफळ होत आहे.’ – श्री. किशन प्रजापती, प्रदेश संयोजक, बजरंग दल, पाली, राजस्थान.
३. ‘भारतात हिंदूंसाठी आवाज उठवावा लागत असेल, तर हिंदूंसाठी ही प्रतिकूल परिस्थिती आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून मला धर्मकार्याची माहिती मिळाली. दधिची ऋषींनी धर्मकार्यासाठी स्वतःचे देह अर्पण केला; त्यांचा आदर्श घेऊन आपणही धर्मकार्यासाठी समर्पित व्हायला हवे.’ – श्री. अविनाश कुमार बादल, प्रदेशाध्यक्ष, हिंदू पूत्र संघटन, बिहार.
४. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंसाठी अतिशय अनुकूल काळ आहे. अयोध्या येथे प्रभु श्रीरामाचे मंदिर काही कालावधीत पूर्ण होणार आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रभु श्रीराम आपल्या समवेत आहेत.’ – सौ. नीता केळकर, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्या, सांगली
५. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळाली आहे. यापुढे माझे जेवढे आयुष्य आहे, ते मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सपर्मित करणार आहे. समर्थ
रामदास स्वामी यांनी प्रत्येक गावामध्ये मारुति मंदिराची स्थापना करून हिंदवी स्वराज्यासाठी मावळे निर्माण केले. शत्रू आपल्या दारापर्यंत पोचले आहेत. हिंदूंनीही स्वत:चे रक्षण करण्यासाठी सिद्ध रहावे.’ – श्री. नित्यानंद दास, उपविभागीय समन्वयक गायत्री परिवार, ओडिशा.
६. ‘या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला येऊन येथील चैतन्य ग्रहण करता आले, यासाठी मी स्वत:ला पुष्कळ भाग्यवान समजतो. मी माझ्या आस्थापनामध्ये सनातन संस्थेने सांगितलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे चालू केले. त्याचे आम्हाला अभूतपूर्व लाभ अनुभवता आले आहेत. हे अधिवेशन ऊर्जासंपन्न आहे. त्याचा लाभ प्रत्येकाला होणार आहे.’ – श्री. उमेश सोनार, संचालक, जसलिन एंडो सर्जिकल प्रा.लि., जळगाव
७. ‘या अधिवेशनामध्ये हिंदुत्वनिष्ठांची संख्या पूर्वीपेक्षा पुष्कळ वाढली आहे. आता सर्वांनाच पटले आहे की, साधना केल्यानेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे.’ – डॉ. नीलेश लोणकर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, पुणे.
मी उर्वरित आयुष्य हिंदु राष्ट्र स्थापनेच्या लढ्यासाठी समर्पित करणार ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी., उपाध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद, कर्नाटक |