‘टायटॅनिक’चे अवशेष पहाण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील सर्वांचा मृत्यू

४ दिवसांपासून बेपत्ता होती पाणबुडी !

नवी देहली – अटलांटिक महासागरात ११२ वर्षांपूर्वी बुडालेल्या महाकाय टायटॅनिक जहाचे अवशेष पहाण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेलेल्या पाणबुडीतील सर्व ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या पाणबुडीत ९६ घंटे पुरेल इतका प्राणवायू होता. ४ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा शोध अद्यापही लागलेला नाही. ४ दिवसानंतर या पाणबुडीतील लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ‘ओशियनगेट’ या आस्थापनाने दिली आहे. या आस्थापनाकडून ही पाणबुडी चालवण्यात येत होती.

‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार शोधमोहिमेवर गेलेल्या पथकाला टायटॅनिकजवळ बेपत्ता पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. या पाणबुडीत चालक, ब्रिटीश नागरिक, धनाढ्य पाकिस्तानी कुटुंबातील २ सदस्य आणि अन्य एका प्रवाशाचा समावेश होता. हे सर्व जण अब्जाधीश होते. टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोचणे, तिथे फिरणे आणि परत येणे, या सगळ्या गोष्टींसाठी ८ घंटे लागतात.