काश्मीरमध्ये यावर्षी आतापर्यंत दगडफेकीची एकही घटना नाही !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये दगडफेकीची घटना शून्यावर आली आहे, अशी माहिती पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली आहे. यावर्षी आतापर्यंत दगडफेकीची एकही घटना घडलेली नाही, तर गेल्या वर्षी दगडफेकीच्या केवळ ५ घटना घडल्या होत्या.
सौजन्य न्यूज इंडिया
भारतीय गुप्तहेर संस्थेच्या (‘आयबी’च्या) एका अहवालानुसार पाकिस्तानच्या आय.एस्.आय. या गुप्तचर यंत्रणेने काश्मीरमधील आक्रमणकर्त्यांना वर्ष २००९ नंतर ८०० कोटी रुपयांहून अधिक रसद पुरवली होती. त्यामुळेच वर्ष २०१६ मध्ये श्रीनगरमध्ये काही संघटना स्थापना झाल्या. पाकिस्तानातून आक्रमण करणारे आतंकवादी करणारे आणि त्यांना हाताळणारे यांच्याकडून काश्मीर खोर्यात पैसा पुरवला जायचा. येथे फुटीरतावादी नेते आणि भूमीगत असलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दगडफेक करणार्या तरुणांची विभागणी होत होती.
दगडफेक रोखण्यासाठी यंत्रणांनी केलेले प्रयत्न !
१. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, पोलीस आणि इतर संस्था यांनी दगडफेकीविरुद्ध कडक धोरण अवलंबले.
२. सरकारच्या अर्थ संस्थांनी ‘हवाला’ आणि परदेशी रसद पुरवठा रोखला.
३. तरुणांना धार्मिक कट्टरवादापासून दूर नेण्यासाठी प्रयत्न केले.
४. दगडफेक करणार्यांना आगरा, तिहार आणि इतर राज्यांतील कारागृहात पाठवले.
संपादकीय भूमिकादगडफेकीची एकही घटना झाली नाही, हे अभिनंदनीय असले, तरी त्याच्या पुढे जाऊन काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले, तर तेथील आतंकवाद मुळासह नष्ट होईल ! |