सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन होणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती
रामनाथी, २२ जून (वार्ता.) – नवीन संघटनेची स्थापन केली जाते, तेव्हा त्यांनी ध्येयही ठरवणे आवश्यक आहे. ध्येय ठरवल्यानेच संघटनेच्या कार्याला दिशा आणि गती मिळते. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनेने ध्येय ठरवून कार्य करणे आवश्यक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित आणि महात्मा यांनी सर्वधर्मसमभावाचे नॅरेटिव्ह (कथानक) भारतियांवर थोपवले. त्याने संपूर्ण हिंदु धर्माला घेरले.
सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन झाले पाहिजे. भारताकडे असलेल्या ज्ञानपरंपरेकडे पाहून संपूर्ण जग भारताकडे आकर्षित होत आहे. हिंदूंचे शास्त्र आणि विज्ञान परिपूर्ण आहे. त्यामुळे हिंदु धर्मसिद्धांत केवळ भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवच्या सप्तम दिनी उपस्थितांना संबोधित करत होते.