‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या वेळी तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांच्या भाषणाचे केलेले सूक्ष्म परीक्षण
१. ‘पूर्वीच्या तुलनेत श्री. टी. राजा सिंह लोध यांची स्थिरता वाढली आहे. ते शांत झाले आहेत.
२. त्यांच्यात विरोध सहन करूनही संघर्ष करण्याची सिद्धता आहे. यामुळे ते स्थिर राहून धर्मकार्यासाठी संघर्ष करतात.
३. त्यांना कर्माच्या माध्यमातून आध्यात्मिक बळ मिळत असल्यामुळे ते लोभ, भय इत्यादी प्रलोभनांना नाकारून दृढतेने धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत.
४. त्यांच्या मनावर साधनेचे संस्कार झाल्यामुळे ते सर्वांनाच साधना करण्यासाठी जागृत करत आहेत आणि सर्वांमध्ये साधनेविषयी प्रबोधन करत आहेत.
५. ते स्वतः साधना करायला शिकले असल्यामुळे त्यांनी हिंदूसंघटननात अहंची अडचण बाजूला करून कार्य करण्यास सांगितले. यातून ‘त्यांच्यात प्रायोगिक आणि धर्मरक्षणाचे तत्त्व जागृत झाले आहे’, असे मला जाणवले.’
– श्री. निषाद देशमुख
६. ‘त्यांची गुरु आणि देवता यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या वाणीत क्षात्रतेज आहे; परिणामी हिंदूंना धर्मकार्य करण्यासाठी स्फूर्ती मिळते.
७. त्यांची ईश्वरावर पूर्ण श्रद्धा असल्याने ते कुठल्याही प्रसंगी निर्भयतेने कार्य करतात. त्यामुळे त्यांच्या हातून धर्मकार्य प्रभावीपणे होते.
८. त्यांच्यात ‘प्रचंड क्षात्रवृत्ती, नेतृत्वगुण आणि धर्माचा अभिमान’ आहे.’
– श्री. राम होनप
९. ‘त्यांनी सरकार आणि हिंदुविरोधी शक्तींचे हिंदूंप्रती दमनतंत्र कशा प्रकारे कार्यरत आहे ?’, याविषयी वस्तूनिष्ठ माहिती दिली. यावरून त्यांच्यातील ‘वस्तूनिष्ठता’ आणि ‘निर्भयता’, हे गुण प्रकर्षाने जाणवले.
१०. त्यांच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीतही हिंदुविरोधी शक्तींशी सतत संघर्ष करून हिंदुत्वाचे रक्षण करण्याची तीव्र तळमळ आणि क्षात्रभाव जाणवतो.
११. त्यांच्यामध्ये हिंदूंचे प्रभावी संघटन करून धर्मसेवा करण्याची सेवावृत्ती जाणवते.’
– कु. मधुरा भोसले
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात. |