लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार : ‘पॉक्सो’अंतर्गत ३ संशयितांना अटक
तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी
रत्नागिरी – तालुक्यातील अल्पवयीन मुलीला यज्ञेश धनावडे, प्रतीक ताम्हणकर, आणि रूतिकेश शिंदे या तिघांनी लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी जयगड पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पोलिसांनी या ३ संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
१९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीत खंडाळा, साठरेबांबर येथे ही घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी पीडित मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गरोदर राहिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६ (२)(जे) ३७६ (२) (एन्) लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ९ (एल) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचे अन्वेषण उपनिरीक्षक क्रांती पाटील करत आहेत.