वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला अनिवासी भारतीय व्यवहार कार्यालयाचे आयुक्त आणि माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर यांची उपस्थिती !
रामनाथी, २२ जून (वार्ता.) – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी (२२.६.२०२३ या दिवशी) केंद्रशासनाच्या अनिवासी भारतीय व्यवहार कार्यालयाचे आयुक्त आणि माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर हे उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पुष्पहार घालून, तसेच श्रीकृष्णाचे चित्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.