देहलीत शनि मंदिर पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न : हिंदूंचा विरोध !
नवी देहली – पूर्व देहलीतील मांडवली येथील शनि मंदिराचा ढाचा पाडण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकार्यांना हिंदूंनी जोरदार विरोध केला. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले लोक आणि सुरक्षादलाचे सैनिक यांच्यात झटापटही झाली. हे मंदिर वर्षभरापूर्वी झाडाखाली बांधल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मोठ्या संख्येने लोकांनी मंदिराच्या ठिकाणी पोचून मंदिर हटवण्यास विरोध दर्शवला आहे.
#WATCH | A large number of people protest against the removal of a portion of a temple in Delhi’s Mandawali area.
Police present on the spot. pic.twitter.com/9zmJAPDiq0
— ANI (@ANI) June 22, 2023
यापूर्वी प्रशासनाने शिवपुरी येथील शिवमंदिराचा ढाचा पाडला होता. पोलिसांच्या उपस्थितीत प्रशासनाने ही कारवाई केली होती. मंदिरांची अवैधरित्या उभारणी करण्यात आल्याच्या तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे हिंदूंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
वजिराबाद रस्त्यावरील भजनपुरा येथील मार्गावर बांधलेले हनुमान मंदिर आणि ‘बीच रोड’वर बांधलेली चांद बाबाची मजार (मुसलमानाचे थडगे) काही दिवसांपूर्वी प्रशासनाने हटवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र विरोधामुळे कारवाई होऊ शकली नाही.
संपादकीय भूमिकाप्रशासनाने असे धाडस कधी मशीद किंवा चर्च पाडण्याच्या संदर्भात दाखवले असते का ? |