नरेंद्र मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते !
‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक
न्यूयॉर्क (अमेरिका) – आतापर्यंत भारत आणि हिंदुत्वनिष्ठ यांना विरोध करणार्या अमेरिकेतील दैनिक न्यूयॉर्क टाइम्सने प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
A simple, old-fashioned radio show is at the heart of Prime Minister Narendra Modi’s popularity, feeding a vast, modern communications apparatus. https://t.co/AB0LY6Phjn
— New York Times World (@nytimesworld) June 21, 2023
न्यूयॉर्क टाइम्समध्ये मुजीब मशाल यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, सामाजिक माध्यमाचा चांगल्याप्रकारे वापर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांत जुन्या रेडिओ या पद्धतीचाही वापर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मधून जनतेशी संवाद साधतात. त्यांचे संभाषण मनापासून असते. ते थेट लोकांच्या मनाशी भिडते. राष्ट्राच्या विकासासाठी केलेले त्यांचे भाषण भारताला जगाशी जोडते. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून किंवा ते सातत्याने विविध देशांना भेटी देतात म्हणून त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे, असे नाही, तर त्यांच्या धोरणांचा लोकांवर प्रभाव आहे, म्हणून ते लोकप्रिय आहेत. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी आणि तरुण यांच्याशीही नियमित संवाद साधतात. ‘मित्रांनो मी तुमच्या संकटात तुमच्यासमवेत आहे’, असा विश्वास मोदी देतात. त्यामळे तरुण आणि विद्यार्थी यांच्यावरही मोदी यांचा चांगला प्रभाव आहे, असेही या वृत्तात म्हटले आहे.