अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील १३० वर्षांपूर्वीची ‘डुरंड लाइन’नावाची सीमारेषा स्वीकारण्यास अफगाणिस्तानचा नकार !
काबूल (अफगाणिस्तान) – पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमा ही केवळ काल्पनिक रेषा आहे. अफगाणचे नागरिक सांगतील, तेव्हा हे सूत्र उपस्थित केले जाईल. तूर्त तरी कोणतेही युद्ध नको, असे विधान तालिबानचा संरक्षणमंत्री आणि तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा मुलगा मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) याकुब मुजाहिद याने केले आहे. गेल्या १३० वर्षांपूर्वीच्या पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात ब्रिटिशांनी ‘डुरंड लाईन’ नावाने सीमारेषा निश्चित केली होती. ती स्वीकारण्यास तालिबान नकार देत आहे. वर्ष २०२१ मध्ये तालिबानच्या सैनिकांनी पाक सैन्याला या सीमेवर काटेरी कुंपण घालतांना रोखले होते. पाकिस्तानमधील पश्तून क्षेत्रावर तालिबानचे वर्चस्व आहे.
तनाव के बीच अफगानिस्तान ने पाकिस्तान को दिखाई आंखें, ‘डूरंड सीमा रेखा को नहीं मानेंगे’, कही दो टूक#afghanistan #pakistan #Indiatvhttps://t.co/u4eNGP6kEe
— India TV (@indiatvnews) June 21, 2023
याविषयी पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार इलियास खान म्हणाले की, ‘डुरंड लाइन’च्या प्रश्नावर तालिबान मागे हटण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यामुळे तालिबानचा मुत्सद्देगिरीवर फार विश्वास ठेवात येणार नाही. आधी रशिया आणि नंतर अमेरिकेसारख्या महाशक्तींना पराभूत करणारा तालिबान पाकविरुद्ध त्याच्या शक्तीचा वापर करण्यास मागेपुढे पहाणार नाही.