उत्तरप्रदेशलगतच्या नेपाळ सीमेवरील अनेक गावे मुसलमानबहुल !
हिंदूंचे अस्तित्वही नाही !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या नेपाळसीमेवरील अनेक गावे मुसलमानबहुल झाल्याचे समोर आले आहे. अनेक गावांत तर हिंदूंचे अस्तित्वच नसल्याचीही माहिती मिळाली आहे.
बिचपटा की आबादी 3500, पर एक भी हिंदू नहीं
रामगढ़ के 550 वोटर में 500 मुस्लिम…
बाॅर्डर के आखिरी गाँव सीतापुरवा में भी सिर्फ मुस्लिम आबादी…
नो मेंस लैंड में भी बसे, नेपाल बाॅर्डर पर ‘घर दामाद’ से डेमोग्राफी चेंज#IndiaNepalBorder #DemographyChangehttps://t.co/LxNlkk8opq
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 22, 2023
१. बिचपाटा गावाची लोकसंख्या अनुमाने ३ सहस्र ५०० आहे; पण यात एकही हिंदु नाही. रामगढ गावात ५५० मतदार आहेत. त्यांपैकी ५०० हून अधिक मुसलमान आहेत. सीतापुरवा हे बहराइच जिल्ह्यातील नेपाळ सीमेवरील शेवटचे गाव आहे. येथेही केवळ मुसलमान असून एकही हिंदु नाही.
२. श्रावस्ती जिल्ह्याच्या सीमेवरील भरत रोशनपुरवा गावाची लोकसंख्या ५ सहस्र आहे. या गावाचे एक टोक भारतात, तर दुसरे नेपाळमध्ये आहे. येथे सीमारेषा दर्शवणारे खांबही दिसत नाहीत. येथे ‘नो मॅन्स लँड’ म्हणजे दोन देशांच्या सीमेमध्ये उरलेली भूमी यांवरही घरे बांधण्यात आली आहेत. या भूमीवर कोणत्याही देशाचा अधिकार नसतो. येथे खांब रोवून किंवा कुंपण बांधून सीमा ठरवली जाते.
३. बलरामपूर जिल्ह्यातील अहलाद्दीह ग्रामपंचायतीचे ग्रामप्रमुख हरीश चंद्र शर्मा यांनी सांगितले होते की, १० किमीच्या परिघात २० गावे मुसलमान आहेत. लोकसंख्येच्या पालटामुळे हिंदूंना भीतीच्या सावटाखाली सण साजरे करावे लागत आहेत.
४. सीमावर्ती भागातील घरे आणि दुकाने यांवर इस्लामी झेंडे फडकतांना दिसतात. बलरामपूर जिल्ह्यात १५० मदरसे सीमेच्या १५ किलोमीटर परिसरात चालू आहेत. मशिदींची संख्या २०० पेक्षा अधिक आहे.
संपादकीय भूमिकाअसे होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? आता यावर काय उपाययोजना केली जात आहे, हे पोलीस आणि प्रशासन सांगेल का ? |