(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राचा अर्थ आहे देशाला नरकात पाठवणे !’ – शिवानंद तिवारी, राष्ट्रीय जनता दल
बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांची गरळओक !
पाटलीपुत्र (बिहार) – भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे. देश हिंदु राष्ट्र बनला, तर देशासाठी ते चांगले होणार नाही; कारण हिंदु राष्ट्रामध्ये असमानता आहे. हिंदूंची लोकशाहीवर श्रद्धा नाही. हिंदु राष्ट्राचा अर्थ आहे देशाला नरकात पाठवणे, असे विधान बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी केले.
राजपथ: RJD ने क्यों छेड़ा ‘हिंदू राष्ट्र’ का राग?
राष्ट्रीय जनता दल के राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी का विवादित बयान, कहा ‘हिंदुओं को लोकतंत्र पर भरोसा नहीं है’ #RJD #Politics #HinduRashtra @ShobhnaYadava pic.twitter.com/4aHHEKBatK
— Zee News (@ZeeNews) June 22, 2023
ते पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्राचा अर्थ देशाची फाळणी करणे, असाही आहे. हिंदु राष्ट्र बनल्यानंतर समानतेचा अधिकार संपुष्टात येईल. हिंदु धर्माविषयी आंबेडकर यांनी योग्यच म्हटले होते की, हिंदु राष्ट्रामुळे खालच्या जातीच्या लोकांची स्थिती प्राण्यांप्रमाणे होईल. खालच्या जातीच्या लोकांची सावलीही शरिरावर पडली, तरी जानवे घालणार्यांना वाटते की, त्यांचा धर्म भ्रष्ट झाला आहे. हिंदु समाज समता आणि समानता यांवर विश्वास ठेवत नाही. (तोंड आहे म्हणून बोलणारे तिवारी ! अशांना हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारायला हवा ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|