लव्ह जिहाद्याचे समर्थन करणार्या ‘सोनी टीव्ही’ला असा शिकवला धडा !
‘सोनी टीव्ही’चा हिंदुद्रोह कशा प्रकारे रोखला, याविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांचे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात अनुभवकथन !
रामनाथी, २२ जून (वार्ता.) – ‘सोनी टीव्ही’वरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत गुन्ह्यांशी संबंधित प्रसंग सविस्तरपणे नाट्यस्वरूपात चित्रित करून दाखवले जातात. ३० डिसेंबर २०२२ या दिवशी गाजलेल्या ‘श्रद्धा वालकर हत्या प्रकरणा’चा एक भाग प्रदर्शित करण्यात आला. हा भाग पाहून देशभरात संतापाची लाट उसळली. या भागामध्ये तपशिलांची मोडतोड करण्यात आली होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यात श्रद्धा वालकर हिचे नाव पालटून एना फर्नांडिस आणि लव्ह जिहादी नराधम आफताबचे नाव पालटून ‘मिहीर’ असे हिंदु मुलाचे पात्र दाखवण्यात आले. यामुळे एका हिंदु मुलाने ख्रिस्ती मुलीचे ३५ तुकडे केल्याचे दाखवण्यात आले. इतका खोटारडेपणा सोनी टीव्हीने केला. हे सर्व धर्मांध लव्ह जिहाद्याचे समर्थन करणारे होते.
Hindu Rashtra Jagruti Andolan held at Dadar, #Mumbai
✊Demand of Pro Hindu Organizations
👉The apology sought by @SonyTV is just to deceive the Hindus, rebroadcast the episode with true events in the retracted episode !#BoycottSonyTV pic.twitter.com/xvIqyqVkzw
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) January 3, 2023
याविषयी लोकांनी हिंदु जनजागृती समितीकडे तक्रारी केल्या. त्यामुळे या घटनेविषयी खडसावण्यासाठी २ जानेवारी २०२३ या दिवशी गुरुग्राम (हरियाणा) येथील सायबर सिटीमध्ये असलेल्या ‘सोनी पिक्चर नेटवर्क’च्या कार्यालयात निषेधाचे पत्र देण्यासाठी गेलो; मात्र सोनी टीव्हीच्या कार्यालयातील अधिकार्यांनी भेट देण्यास नकार दिला आणि मुंबईतील कार्यालयात पत्र नेऊन देण्यास सांगितले. यानंतर त्यांच्या कार्यालयाच्या बोर्डसमोरच आम्ही एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्याच दिवशी ‘बॉयकॉट सोनी टीव्ही’ (#BoycottSonyTV) हा हॅशटॅग सामाजिक माध्यमांवर ट्रेण्ड (प्रसारित) झाला. या सर्वांचा परिणाम म्हणून अवघ्या ३० मिनिटांतच सोनी टीव्हीच्या कार्यालयातून आम्हाला फोन आला आणि त्यांनी आम्हाला विनंती केली, ‘‘तुम्ही या, आम्ही तुमचे निवेदन स्वीकारायला तयार आहोत.’’ आम्ही त्यांना सांगितले, ‘‘आता आम्ही येणार नाही. तुम्ही समस्त हिंदु समाजाची माफी मागा. जोवर तुम्ही माफी मागणार नाही, तोवर हिंदुत्वनिष्ठ सोनी टीव्हीवर बहिष्कार घालण्याची मागणी कायम ठेवू. आमचे पत्र आम्ही सामाजिक माध्यमे आणि पत्र्यव्यवहार करून तुम्हाला पाठवू !’’
— Sony LIV (@SonyLIV) January 2, 2023
त्यानंतर रात्री ८ वाजता सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत ‘सोशल मीडिया अकाऊंट’वर ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत दाखवण्यात आलेल्या भागातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही खेद व्यक्त करत आहोत’, अशा स्वरूपाची पोस्ट केली. तसेच त्यांच्या सर्व प्रकारच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून तो वादग्रस्त २१२ क्रमांकाचा भाग काढून टाकण्यात आला.
अशा प्रकारे हिंदु धर्मावर आघात करणार्यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवल्याविना स्वस्थ बसू नका !’ – श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, देहली