‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या वेळी मान्यवरांनी केलेल्या भाषणाचे सूक्ष्म परीक्षण
कर्नल आर्.एस्.एन्. सिंह, रक्षा विशेषज्ञ, देहली.
१. ‘कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांच्यात उत्तम निरीक्षणक्षमता आहे, तसेच त्यांची बुद्धी विश्लेषणात्मक आहे.
२. त्यांच्यात राष्ट्रजागृती आणि धर्मजागृती यांची तळमळ आहे. त्यामुळे ते सांगत असलेल्या सूत्रांचा परिणाम सर्व श्रोत्यांच्या मनावर होऊन ते अंतर्मुख होत होते.
पू. स्वामी चित्तरंजन महाराज, शांती काली आश्रम, अमरपूर, त्रिपुरा
१. ‘पू. स्वामी चित्तरंजन महाराज यांच्यातील ‘धर्मरक्षणासाठी कष्ट घेण्याची तळमळ’ आणि ‘त्याग’ या गुणांमुळे प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना यश मिळते.
२. ते मनमोकळेपणाने आणि तळमळीने सर्व सूत्रे मांडत असल्यामुळे ‘त्यांचे भाषण ऐकतच रहावे’, असे हिंदूंना वाटत होते.’
३. ‘त्यांची वाणी अत्यंत सात्त्विक आहे आणि त्यांचे हिंदु धर्मावर नितांत प्रेम आहे.’
४. ‘ते क्षात्रवृत्तीने आणि धर्मावर ठाम श्रद्धा ठेवून प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जातात आणि तेथील हिंदूंना संघटित करून त्यांचे रक्षण करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करतात. अशा प्रकारे ते अविरतपणे धर्मसेवा करतात.
– श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.६.२०२३)
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |