पंढरपूर येथे ५ सहस्रांहून अधिक क्षमता असलेल्या बसस्थानकाची उभारणी !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – ३४ फलाट असलेले कायमस्वरूपी बसस्थानक शहरातील सरगम चौक येथे उभारण्यात आले आहे. एकाच वेळी ५ सहस्रांहून अधिक प्रवासी क्षमता असलेले हे बसस्थानक राज्यातील सर्वांत मोठे बसस्थानक असल्याचा दावा परिवहन महामंडळाने केला आहे.
( सौजन्य: abp माझा )
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या पहाता मोठे बसस्थानक बांधण्याचा निर्णय ३ वर्षांपूर्वी राज्यशासनाने घेतला होता. त्यासाठी २३ कोटी रुपये व्यय करण्यात आले आहेत. हे बसस्थानक २३ जूनपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे.