(म्हणे) ‘अल्पसंख्यांकांचे दमन करणार्या पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाला मी उपस्थित रहाणार नाही !’ – खासदार उल्हान उमर, अमेरिका
अमेरिकेतील मुसलमान महिला खासदार उल्हान उमर यांची घोषणा !
न्यूयॉर्क (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. ते अमेरिकेच्या संसदेला मार्गदर्शन करणार आहेत. याविषयी अमेरिकेतील मुसलमान महिला खासदार इल्हान उमर यांनी म्हटले आहे की, त्या पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेच्या संसदेतील मार्गदर्शनाला उपस्थित रहाणार नाहीत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने धार्मिक अल्पसंख्यांकांचे दमन केले आहे. हिंसक हिंदु राष्ट्रवादी समूहांना आलिंगन दिले आहे. पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे मी मोदी यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी उपस्थित रहाणार नाही. मी पंतप्रधान मोदी यांनी केलेले दमन आणि हिंसा यांवर चर्चा करण्यासाठी मानवाधिकार समूहासमवेत एक पत्रकार परिषद घेणार आहे’, असे म्हटले आहे.
Ilhan Omar and Rashida Tlaib, 2 US Congress lawmakers to boycott Modi’s address: Who they are and how they have been spreading Islamic terrorist viewshttps://t.co/yVNl7bhjnF
— OpIndia.com (@OpIndia_com) June 21, 2023
सामाजिक माध्यमांतून खासदार इल्हान उमर यांच्यावर होत आहे टीका !
मूळच्या आफ्रिका खंडातील सोमालिया येथील असणार्या खासदार इल्हान उमर यांच्या मोदी यांच्या विषयीच्या या विधानावरून त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका करण्यात आली. काही जणांनी म्हटले की, तुम्हाला मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी जाण्याची आवश्यकताही नाही; कारण मोदी यांना स्वतःच्या भावाशी विवाह करणारे आवडत नाहीत. (उमर यांनी स्वतःच्या भावाशी विवाह केला आहे.)
उमर यांनी गेल्या वर्षी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता. तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले होते. यास अमेरिका आणि भारत दोघांनीही विरोध केला होता.
संपादकीय भूमिका
|