हिंदु मुलाशी लग्न करणार्या मुसलमान तरुणीला केरळ पोलिसांनी मंदिरातून ओढत नेले !
कोवलम् (केरळ) – येथे एका मंदिरात हिंदु मुलगा आणि मुसलमान तरुणी यांचा लग्नविधी चालू असतांना पोलीस मंदिरात घुसले आणि त्यांनी लग्नविधी थांबवत नववधूला मंदिरातून बलपूर्वक ओढत घेऊन गेले. आल्फिया आणि अखिल अशी या दोघांची नावे ओत. या वेळी नववधूने, म्हणजे आल्फियाने ओरडून पोलिसांना सांगितले की, तिला जायचे नाही. ती स्वेच्छेने संबंधित अखिलशी विवाह करत आहे; मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करून तिला बलपूर्वक ओढत नेले.
Hindu man and Muslim woman decide to get married in Temple, invite ire of Kerala police: Girl’s family files complaint, police manhandles groomhttps://t.co/vAONHyuw00
— OpIndia.com (@OpIndia_com) June 19, 2023
अलप्पुजा जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले की, कायमकुलम् पोलीस ठाण्यात अल्फिया नावाची मुलगी हरवल्याची तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. पोलिसांना तिला न्यायालयात उपस्थित करायचे होते. पोलिसांनी आल्फियाला न्यायालयात उपस्थित केले असते तिने तेथे ती स्वत:च्या इच्छेने अखिलसमवेत गेल्याचे सांगितले. तिचे वक्तव्य नोंदवल्यानंतर तिला अखिलसमवेत जाण्याची अनुमती देण्यात आली.
आल्फियाने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच तिने असे सांगितले होते की, ती तिच्या स्वत:च्या इच्छेने अखिलशी विवाह करण्यासाठी त्याच्यासमवेत जात आहे. तिच्या आई-वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. ते तिला अखिलपासून दूर करू पहात होते; म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती.
संपादकीय भूमिकाएखाद्या हिंदु मुलीचा मुसलमान तरुणाशी विवाह चालू असतांना तो रोखण्याचे धाडस पोलिसांनी दाखवले असते का ? |