‘आदिपुरुष’ चित्रपटावर बहिष्कार घाला ! – पू. कालीचरण महाराज
पू. कालीचरण महाराज यांचे हिंदु समाजाला आवाहन !
मुंबई – काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर बहिष्कार घाला, असे आवाहन पू. कालीचरण महाराज यांनी हिंदु समाजाला केले. या चित्रपटातील भाषा, प्रभु श्रीराम आणि सीता यांचे चित्रण, रावणाच्या संदर्भातील प्रसंग आदींवर हिंदूंनी आक्षेप घेतला आहे.
आदिपुरुष सिनेमाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.#Adipurush #KalicharanMaharaj https://t.co/TF03NWJ0Ui
— Saamana (@SaamanaOnline) June 19, 2023
पू. कालीचरण महाराज पुढे म्हणाले, ‘‘आदिपुरुष’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटना हिंदुविरोधी आहेत, तसेच त्यात देवतांच्या चरित्राचा अवमान करणारे शब्द वापरण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार निंदनीय आहे. हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंदूंनी या चित्रपटावर बहिष्कार घातला पाहिजे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट मी पाहिलेला नाही. जे लोक या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत, ते धर्मविरोधी आहेत. ज्यांना वाईट वाटत आहे, ते धर्मप्रेमी आहेत. जे धर्मप्रेमी आहेत, त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार घातला पाहिजे.’’