उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात
मुंबई – सरकारने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. ‘मातोश्री’वर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. मातोश्रीवरील राज्य राखीव पोलीस दलाची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. ‘झेड प्लस’ सुरक्षा आता ‘वाय प्लस’ करण्यात आली आहे.
आताची मोठी बातमी! ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात, ‘मातोश्री’वरची सुरक्षाही केली कमी#Matoshree #UddhavThackeray #Security #AdityaThackeray @ShivSenaUBT_ https://t.co/WELheTVjs3
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 21, 2023