पाकिस्तानातील शैक्षणिक संस्थांमध्ये होळी साजरी करण्यावर बंदी !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये होळी खेळण्यावर बंदी घातली आहे. आयोगाने त्याच्या आदेशात म्हटले आहे की, होळीसारखे सण सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांपासून वेगळे झालेले आहेत. अशा प्रकारचे सण साजरे करणे, हे इस्लामी ओळखीपासून वेगळे होण्यासारखे आहे.

संपादकीय भूमिका 

  • भारतातील इस्लामी संस्था, त्यांचे धर्मगुरु आदी यास विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • पाकिस्तानात भविष्यात हिंदूच शिल्लक ठेवले जाणार नाहीत. त्यामुळे तेथे हिंदूंचे कोणतेही सण साजरे होणार नाही, ही स्थितीही लवकर आल्यास आश्‍चर्य वाटू नये !