संयुक्त राष्ट्रांत चीनकडून पुन्हा एकदा पाकिस्तानी आतंकवाद्याची पाठराखण !
साजीद मीर याला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला !
न्यूयॉर्क (अमेरिका) – मुंबईवत २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणातील पसार पाकिस्तानी आतंकवादी साजीद मीर याला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करावे, यासाठी भारत आणि अमेरिका यांनी संयुक्त राष्ट्रांत मांडलेला प्रस्ताव चीनने रोखून धरला. साजीद मीर हा ‘लष्कर-ए-तोयबा’चा आतंकवादी आहे. हा प्रस्ताव संमत झाला असता, तर मीर याची संपत्ती गोठवून त्याच्यावर प्रवासबंदी लादून त्याच्या शस्त्रास्त्र व्यापाराला आळा घालता आला असता. चीनने याआधी हा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याचे सप्टेंबरमध्ये स्पष्ट झाले होते; पण आता चीनने प्रस्तव संमत करण्यास नकार दिला आहे.
आतंकवाद को लेकर पड़ोसी देश चीन का असली चेहरा एक बार फिर सामने आ गया है #Chinahttps://t.co/MTtIWRweqS
— AajTak (@aajtak) June 20, 2023
१. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रकाश गुप्ता यांनी संयुक्त राष्ट्रांत साजीद मीर याचे एक संभाषणही ऐकवले. यात साजीद मीर मुंबईवरील आक्रमणातील आतंकवाद्यांना आदेश देत असल्याचे दिसून येते. यात तो म्हणतो, ‘ताज हॉटेलमध्ये असणार्या सर्व विदेशी नागरिकांना ठार मारा.’ आक्रमणाच्या १५ वर्षांनंतरही साजीद उघडपणे फिरत आहे. त्याला एका देशात सर्व प्रकारच्या सुविधा मिळत आहेत.
२. आम्ही अशा आतंकवाद्यांना ‘जागतिक आतंकवादी’ घोषित केले आहे; मात्र काही देश भू-राजकीय हितांमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत असे घोषित करत नाहीत. याचा अर्थ आहे की, अशा देशांकडे आतंकवादाचे आव्हान मोडून काढण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही.
संपादकीय भूमिका
|