येत्या मकरसंक्रांतीला अयोध्येतील श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेले भव्य श्रीराममंदिर पुढील वर्षी मकरसंक्रांतीच्या वेळी दर्शनासाठी उघडणार असल्याची माहिती ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या सदस्याने दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
Watch | राम मंदिर के प्राण प्रतिष्ठा की टाइमलाइन, मकर संक्रांति पर होगी प्राण प्रतिष्ठा
मातृभूमि @akhileshanandd के साथ | https://t.co/smwhXUROiK@upadhyayabhii #MatrbhumiOnABP #RamMandir #Ayodhya #UttarPradesh pic.twitter.com/tiyfkASSpo
— ABP News (@ABPNews) June 20, 2023
१४ किंवा १५ जानेवारी २०२४ या दिवशी म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिनानिमित्त गाभार्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनीही सांगितले होते की, वर्ष २०२४ मध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊ शकते.