हिदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करायला हवेत ! – अधिवक्ता अतुल जेसवानी, संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष, हिंदू सेवा परिषद, मध्यप्रदेश
रामनाथी, २१ जून (वार्ता.) – आपल्या आजूबाजूला ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी हिंदूंनी खोलात जाऊन काम करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या घटना लक्षात येताच हिंदू बांधवांनी त्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांपर्यंत पोचवायला हव्यात. ‘धर्मावरील आघात होण्यापूर्वीच ते लक्षात येतील’, अशी व्यवस्था हिदूंनी निर्माण करायला हवी. ‘हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ ज्याच्यावर आपली मालकी आहे, असा भूमीचा तुकडा नव्हे, तर ‘जेथे लव्ह जिहाद, गोहत्या, बलात्कार, धर्मांतर आदी होणार नाही’, असे राष्ट्र होय. ‘हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे’; म्हणून हिंदूंनी स्वस्थ राहून चालणार नाही. उलट हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करायला हवेत. धर्मकार्य आस्थेने करायला हवे, असे उद्गार मध्यप्रदेश येथील ‘हिंदू सेवा परिषदे’चे संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता अतुल जेसवानी यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.