सनातनच्या साधकांना विनामूल्य साहाय्य करणारे नाणिज, रत्नागिरी येथील जगद़्गुरु नरेंद्र महाराज यांचा मठ !
‘११.५.२०२३ या दिवशी होणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’निमित्त जळगाव येथून काही साधक गोवा येथे जाण्यास निघाले होते. जळगाव ते गोवा प्रवास दूरचा असल्यामुळे रत्नागिरी येथील नाणिज येथे जगद़्गुरु नरेंद्र महाराज यांच्या मठामध्ये त्यांनी साधकांना विनामूल्य निवास आणि भोजन यांची व्यवस्था केली होती. त्या वेळी तेथे जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘आश्रमात प्रतिदिन रात्री ९.३० वाजता महाप्रसादाची वेळ संपते; पण आमच्यासाठी ते रात्री १०.३० पर्यंत थांबले आणि ११.१५ पर्यंत त्यांनी सर्वांना जेवण वाढले.
२. तिथे रात्री ठराविक वेळेनंतर पाणी बंद करून सकाळी ६ वाजता चालू केले जाते; पण आमच्यासाठी त्यांनी रात्री आवश्यक तिथे पाणी भरून ठेवले होते आणि सकाळीही ५ वाजता पाणी सोडले.
३. तेथील आमची झोपण्याची व्यवस्थाही स्वच्छ आणि चांगली होती. प्रसाधनगृहही अतिशय स्वच्छ होते. त्यांच्या भक्तांकडून ते निवासासाठी अर्पणमूल्य घेतात; पण आम्हाला विनामूल्य उपलब्ध करून दिले.
४. तिथे निवासाच्या ठिकाणी वाहन आणायला अनुमती नसते; पण आपल्या काही वयस्कर साधकांसाठी त्यांनी लगेच अनुमती दिली. तेथील भक्तांचे बोलणे आणि वागणेही नम्र होते.’
– कु. श्वेता पट्टणशेट्टी, जळगाव (१६.५.२०२३)
‘२२ घंटे सलग बस चालवूनही प्रवास व्यवस्थित झाला’, ही मोठी अनुभूती वाटल्याचे बसचालकाने सांगणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’निमित्त जळगाव ते गोवा असा बसने प्रवास करतांना बसचालकांची जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘बसचालक हे पुष्कळ सात्त्विक होते.
२. जळगावहून गोवा येथे जातांना ३१ घंटे प्रवास झाला (त्या वेळी मध्ये ६ घंटे विश्रांती झाली); पण तिथून परत येतांना २२ घंटे कुठेही विश्रांती न घेता रात्री आणि दिवसा सलग प्रवास केला, तरी दोन्ही बसचालक थकलेले दिसत नव्हते. ते हसतमुख आणि आनंदी दिसत होते.
२. त्यांचे वागणे नम्र असून त्यांचे कोणतेच गार्हाणे नव्हते. दोन्ही चालक सलग २४ घंटे न झोपता आळीपाळीने गाडी चालवत होते.
३. जळगाव येथे पोचल्यावर बसचालकांना विचारले, ‘‘तुम्हाला प्रवासात काही अनुभव आला का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘इतका दूरचा प्रवास आम्ही पहिल्यांदाच केला आणि तोही इतका व्यवस्थित पार पडला. गाडी इतका वेळ सलग प्रवास करू शकत नाही. तिला काही घंटे मध्ये विश्रांती द्यावी लागते; पण तसे न करताही ती व्यवस्थित आली, हीच मोठी अनुभूती आहे.’’
– कु. श्वेता पट्टणशेट्टी, जळगाव (१६.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |