रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर केरळ येथील सुश्री (कु.) रश्‍मी परमेश्‍वरन् (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) यांना आलेल्‍या अनुभूती !

सुश्री (कु.) रश्‍मी परमेश्‍वरन्

१. रामनाथी आश्रमातील श्री गणेशाच्‍या मूर्तीकडे पाहून आलेल्‍या अनुभूती

अ. ‘रामनाथी आश्रमातील श्री गणेशाच्‍या मूर्तीकडे पाहून ‘तेथे साक्षात् श्री गणेश बसला आहे’, असे मला वाटले.

आ. गणेशाचे दर्शन घेतांना ‘गणेशमूर्ती जिवंत असून मला आशीर्वाद देत आहे’, असे मला वाटले.

इ. ‘श्री गणेश साधकांचे मन आणि बुद्धी यांवरील काळ्‍या शक्‍तीचे आवरण नष्‍ट करून साधकांना गुरुसेवा करण्‍यासाठी संरक्षककवच प्रदान करत आहे’, असे मला जाणवले.

२. श्री भवानीदेवीच्‍या मूर्तीचे दर्शन घेतांना ‘देवी त्रिशूळ घेऊन उभी आहे. तिची सगुण-निर्गुण दोन्‍ही तत्त्वे आहेत आणि ती साधकांना आवश्‍यकतेनुसार शक्‍ती देत आहे’, असे मला वाटले.

३. एकदा मी आश्रमातील तिसर्‍या मजल्‍यावर गेले असतांना माझ्‍या शरिराला अत्‍यंत हलके वाटले आणि ‘मी भूमीवर नसून भूमीपासून थोडी वर आहे’, असे मला वाटले.’

– सुश्री (कु.) रश्‍मी परमेश्‍वरन् (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), कोची, केरळ. (२९.६.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक