‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’च्या चौथ्या दिवसातील पहिल्या सत्राचे सूक्ष्म परीक्षण
‘१९.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी देवाने आमच्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. श्री. राहुल दिवाण, अध्यक्ष, शरयु ट्रस्ट, देहली
अ. श्री. राहुल दिवाण प्रामाणिकपणे आणि स्वतःची पूर्ण क्षमता वापरून हिंदु धर्माचे कार्य करत असतात.
आ. ‘श्री. राहुल दिवाण यांच्यात ‘नियोजन, नम्रता आणि व्यापकता’, असे विविध गुण आहेत.
इ. त्यांच्यात राष्ट्र आणि धर्म यांच्या विकासाची तळमळ आहे.
ई. ‘त्यांचे प्रयत्न आंतरिक तळमळीने होत आहेत. ते धर्मांतरित हिंदूंना पुन्हा स्वधर्मात येण्याचे आवाहन करतात. तेव्हा त्यांचा धर्मभाव आणि तळमळ पाहून लोक ‘घरवापसी’ करतात.
२. सौ. ज्योती शर्मा, प्रांत सहसंयोजक, हिंदु जागरण मंच, छत्तीसगड
अ. सौ. ज्योती शर्मा प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर असतात.
आ. त्यांच्यात प्रचंड क्षात्रवृत्ती आहे.
इ. त्यांच्यात ‘दृढ आत्मविश्वास, धर्मावरील दृढ श्रद्धा, धर्मतेज, धर्मरक्षणाची तळमळ आणि हिंदु धर्माच्या रक्षणासाठी त्याग करण्याची वृत्ती’ आहे.
ई. त्या बुद्धी आणि शक्ती युक्त रणरागिणी असून निर्भयतेने धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत.
३. श्री. जुगल किशोर तिवारी, संरक्षक, अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषद, उत्तरप्रदेश
अ. श्री. तिवारी यांच्या विचारांमध्ये सुस्पष्टता आहे. त्यामुळे त्यांच्या विषयाचे श्रोत्यांना सहजतेने आकलन झाले.
आ. त्यांचा विविध विषयांचा सखोल अभ्यास करण्याचा स्वभाव आहे.
इ. त्यांच्या मनात अधर्माविषयी चीड आहे.
ई. त्यांच्यातील सात्त्विकतेमुळे सर्वांना त्यांच्याविषयी आत्मीयता वाटते.
उ. त्यांच्यात ‘अभ्यासू वृत्ती, धर्मरक्षणाची तळमळ, निर्भयता, सत्यनिष्ठता, प्रामाणिकपणा’, असे अनेक गुण आहेत.
ऊ. ते नियमितपणे धर्माचरण करत आल्यामुळे त्यांच्यामध्ये हिंदुतेज जागृत झाले आहे. त्यांच्यावर देवतांची पुष्कळ कृपा आहे. त्यामुळे ते मांडत असलेला विषय ज्ञानतेजाने परिपूर्ण आहे.
ए. धर्माप्रती दृढ श्रद्धा ठेवून ते राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करतात.
– श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात. |